Share

आता ठाकरे आडनाव बदलून ‘झोलझाल’ ठेवा, निलेश राणेंचा घणाघात

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला तशी विनंती केली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.

या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन कर मंडळाने सीबीडीटीला फेरपडणताळणीची विनंती केली आहे. त्याबाबत स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे. ठाकरे पिता-पुत्र व सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातील ताळेबंदाची फेरपडताळणी करावी, असं कर मंडळानं म्हटलं आहे.

यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे पितापुत्रांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जिथे बघावं तिथे या लोकांनी घाण करून ठेवली आहे. बीएमसी मध्ये भ्रष्टाचार, मर्डर केस मध्ये सतत नाव, इलेक्शन affidavit मध्ये खोटी माहिती देणं. ठाकरे आडनाव बदलून झोलझाल ठेवा’. अस ट्विट करत निलेश राणे यांनी ठाकरे पितापुत्रांवर प्रहार केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!