Share

देवगिरी कारखान्याच्या सर्वसाधारण बैठकीस आमदार गैरहजर; माजी चेअरमन काळे नाराज

Published On: 

फुलंब्री : देवगिरी कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मात्र या सभेस सभेची मागणी करणारे आमदार हरीभाऊ बागडे अनुपस्थित राहिल्याने देवगिरीचे माजी चेअरमन जगन्नाथ काळे नाराज झाले. या सभेची मागणी करणारे आमदारच बैठकीस अनुपस्थित राहु कसे शकतात. असे काळे म्हणाले.

सर्वसाधारण सभा घेतल्याशिवाय अवसायक हटवता येत नाही व प्रशासकीय कार्यकारी मंडळही आणता येत नाही आमदार हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र बैठकीला ते स्वत: गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीत कारखाना अवसायक श्रीराम सोन्ने यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यात देवगिरी सहकारी साखर कारखाना पुनरुज्जिवित करणे व संस्थेच्या देणीबाबत तडजोड करणे, अशा दोन विषयांवर एकमुखी ठराव संमत झाला. यामुळे दहा वर्षांपासून बंद कारखाना चालू होणार असल्याने शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे.

देवगिरी साखर कारखान्यावर ६९ कोटी २० लाखांचे कर्ज आहे. तर कारखान्याची मालमत्ता ही १९७ कोटी ५३ लाखांची आहे. या रकमेवर चार कोटीचे व्याज प्राप्त झालेले आहे. समृद्धीचे दिलेले ३१ कोटी ३१ लाख रु. व चौका येथील कारखान्याच्या मालकीची ४२ एकर २२ गुंठे जमीन ही लिलावात विक्री केली. याचे सात कोटी ४० लाख रुपये असे एकूण ३८ कोटी ७१ लाख रुपये हे ऋण प्राधिकरण यांच्याकडे रोख रकमेत पडून आहे. यासाठी अवसायक हटवून कार्यकारी मंडळ असले तरच हे निर्णय होऊ शकतात व कारखाना सुरू होण्यास चालना मिळेल, तर दुसरा गट हा अवसायकाच्या वतीनेच निर्णय घ्या अन्यथा संचालकांची निवडणूक घ्या, अशी मागणी करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!