नांदेड : शासनाच्या तिजोरीतून कोरोडोचा डल्ला मारणाऱ्या दोघांविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. रमेश गुलाबराव चव्हाण आणि मनोज रघुनाथ चव्हाण अशी दोन्ही आरोपींची नावे आहे. विशेष म्हणजे हे दोघे आरोपी २०१२ पासून भोकर तालुक्यातील चिदगिरी येथे मनरेगा तसेच वन विभागाच्या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावावर खाते उघडून शासनाकडून कोट्यावधी रुपये लाटले. या प्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रारी गेल्यावर भोकर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सांगत ग्रामस्थांकडून त्यांची कागदपत्र घेऊन त्यांच्या नावाची बनावाट खाती उघडून त्यांचा एका मशीनवर अंगठ्याचा ठसा घेत असे. त्यानंतर राज्यातील मुंबई येथे एकच शाखा असलेल्या आयडीएफसी बँकेत ग्रामस्थांना न कळत त्यांची खाती उघडली. त्या बँकेत सुमारे २००० खाती उघडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे आधार कार्डच्या आधारे सीम कार्ड मिळवून बँकेकडून एटीएम देखील मिळवले. त्यानंतर हि सर्व नावे मनरेगा आणि वन विभागाच्या यादीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
दोन खात्याने अचंबित त्यामुळे उघडकीस आला प्रकार
खात्यातील पैसे काढण्यासाठी साहेब नारायण वाघमारे बँकेत गेले होते. मात्र, बँक बंद असल्याने नेट बँकिंग द्वारे पैसे काढण्याचे त्यांनी ठरवले, वाघमारे यांचे नाव टाकताच दोन खाते समोर आले त्यामुळे वाघमारे अचंबित झाले. दुसऱ्या खात्याची माहिती घेतली असता. ते आयडीएफसी बँकेचे खाते असल्याचे समोर आले. त्याचा तपशील घेतला असता त्याखात्यावर ६५ हजार ११७ रुपये मनरेगा आणि वन विभागाच्या कामाचे असल्याचे समजले, आणि हा प्रकार समोर आला.
महत्वाच्या बातम्या
- एक असाही छंद : बारवांचा शोध घेण्यासाठी रोहन फिरतोय रानोमाळ
- ग्राहक मंचाचा एसबीआयला दणका, रक्कम व्याजासह देण्याचे आदेश
- गांधी स्मृतिदिनी अमेरिकेत पुन्हा महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना…
- ‘ऊर्जा खात्याला तातडीने 10 हजार कोटी द्या नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लवकरच अनावरण


