Share

राज ठाकरे यांच्या भेटीसाठी विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्या ‘कृष्णकुंज’वर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अयोध्येतील प्रभू श्री रामाचं मंदिर निर्माण कार्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून निधी संकलनाचे काम सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे यांची भेट असून मनसेच्या वतीने देखील भविष्यात वेगवेगळ्याा ठिकाणी निधी संकलन करणे, तसंच हिंदू मुद्द्यांवरून सहकार्य करणे, अशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा हिंदुत्वाची शाल पांघरून घेणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच मनसेच्या वतीने राज ठाकरे पुढील महिन्यांमध्ये श्रीराम प्रभू नगरी यांची अयोध्या येथे दौरा आयोजित करण्याचे जाहीर झाले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच विश्व हिंदू परिषदेचे काही नेते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

विश्व हिंदू परिषदमधील प्रांत संघटन मंत्री अनिरुद्ध देशपांडे, सहमंत्री श्रीराज नायर हे सोमवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रचार-प्रसार विभागाचे कोकण प्रांत प्रशांत पळ यांनी दिली आहे.

प्रभू रामचंद्र मंदिराच्या निधी संकलनाचा कार्यक्रम सध्या विश्व हिंदू परिषद आणि भाजप सारख्या संघटना राज्यात राबवत आहेत. वेगवेगळ्या संस्था ट्रस्ट यांच्या माध्यमातून दानशूर लोक देखील मंदिराच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा निधी देत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!