Share

कोण होणार सभागृह नेता, नांदेडकरांमध्ये उत्सुकता

Published On: 

नांदेड : शहरात सध्या मनपाच्या सभागृह नेते पदासाठी सुरु असलेली रस्सीखेच पाहता चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. मनपाचे सभागृह नेते विरेन्द्र्सिघ गाडीवाले यांची स्थायी समिती सभापती पदी वर्णी लागल्याने सभागृह नेते पद रिक्त झाले आहे. त्यातच नगरसेवक आनंद चव्हाण, अमितसिंह तेहरा, शमीम अब्दुल्ला, कनकदंडे यांची नावे आघाडीवर आहे. त्यातच आता सभागृह नेत्याची खुर्ची कोणाला मिळणार याकडे नांदेडकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

आपआपल्या परीने नगरसेवक पालकमंत्री अशोक चव्हान यांच्याकडे फिल्डिंग लावण्याच्या प्रयत्नात असून, त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जाण्याचे काहींनी ठरवले आहे. त्यातच मा. उपमहापौर, जेष्ठ नगरसेवक आनंद चव्हाण, सय्यमी आणि शांत नगरसेवक म्हणून ओळख असणारे अमितसिंह तेहरा, सध्या ते स्थायी समितीचे सदस्य असून वेळप्रसंगी ते सदस्यपदाचा राजीनामाही देण्याची शक्यता आहे. उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदाचा अनुभव असलेले शमीम अब्दुल्ला यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. तर आज वर कोणत्याही पदावर काम करण्याची संधी न मिळालेले महेश कनकदंडे यांचेही नाव चर्चेत आहे.

त्यामुळे आता सभागृह नेते पदाच्या खुर्चीसाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत असून, चव्हाण, तेहरा, अब्दुल्ला आणि कनकदंडे यांच्यात आगामी काळात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावण्याच्या चर्चेला उधान आले असून, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीची तयारी दर्शवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!