🕒 1 min read
इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
दरम्यान, न्युझीलंडकडून मिळालेल्या पराभवाचं कारण इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुक यांनी सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाचे फलंदाज स्विंग गोलंदाजीसमोर ढेपाळतात.
भारतीय संघाच्या पराभवाचे मूळ कारण, स्विंगसमोर आलेले अपयशच आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय क फलंदाजांना स्विंग चेंडूला कसे सामोरे जायचे याचा सरावच केलेला नसल्याचे स्पष्टदिसून आले. त्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ यशस्वी होईल असे मला वाटत नाही, असेही कुक म्हणाला. या कारणामुळेच भारतीय फलंदाजांना इंग्लंडमध्ये फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल, असेही त्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- …तरीही शिखर धवनला संधी नाहीचं
- आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात; मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार
- रहाणेच्या अपयशावर बोट ठेवत संजय बांगरने सुचवले ‘हे’ पर्याय
- भारतीय संघाला दुय्यम म्हणणाऱ्या रणतुंगाला आकाश चोप्राने दिले सडेतोड उत्तर
- ‘भारतीय संघ इंग्लंडमध्ये यशस्वी होईल’, चॅपेलनी व्यक्त केला विश्वास


