Share

मैदानात उतरताच मिताली राजने घडवला इतिहास ; तेंडुलकरनंतर ‘हा’ विक्रम करणारी दुसरी क्रिकेटपटू

Published On: 

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट टीम मैदानात उतरली. रविवारी (७ मार्च) पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 मॅचच्या वनडे सीरिजला सुरूवात झाली. पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं. मैदानात उतरताच मिताली राजने इतिहास घडवला.

मिताली राज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं चौथं दशक खेळत आहे. 1999 साली तिने वनडे क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याचसोबत मिताली सगळ्यात जास्त काळ वनडे क्रिकेट खेळणाऱ्या सनथ जयसूर्याच्या पुढे निघून गेली आहे. मिताली सचिन तेंडुलकरनंतर सगळ्यात मोठं वनडे करियर असणारी महिला खेळाडू आहे.

सचिन तेंडुलकरची वनडे कारकीर्द 22 वर्ष 91 दिवसांची होती. तर मिताली राजची वनडे कारकीर्द 21 वर्ष 254 दिवस आहे. सगळ्यात जास्त काळ वनडे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. जयसूर्याचं वनडे करियर 21 वर्ष 184 दिवसांचं होतं. 20 वर्ष 272 दिवसांसह जावेद मियांदाद चौथ्या क्रमांकावर आणि 19 वर्ष 337 दिवसांसोबत क्रिस गेल पाचव्या क्रमांकावर आहे.

38 वर्षांच्या मिताली राजने 26 जून 1999 साली आयर्लंडविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. रविवारी मैदानात उतरेपर्यंत तिच्या नावावर 209 वनडे मॅचमध्ये 6,888 रन होत्या. यात 7 शतकं आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये तिचा सर्वाधिक स्कोअर नाबाद 125 रन आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!