🕒 1 min read
बीड: जिल्ह्यातील परळी बायपास व परळी धर्मापुरी या महामार्ग कामाच्या श्रेयावरून राजकारण चांगलंच रंगताना दिसत आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या महामार्गासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केले असल्याचे बोलले जात आहे, मात्र दुसरीकडे फुकटचे श्रेय घेत असल्याची टीका त्यांच्यावर पंकजा मुंडे यांनी केली आहे.
परळी बायपास व परळी धर्मापुरी रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. दहा पैशाचे योगदान नसताना, दहा रुपयाचा निधी आणण्यात अपयशी ठरलेल्या मंत्री महोदयांचा फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दहा पैशांचे योगदान नसताना , दहा रुपयाचा निधी आणण्यात अपयशी ठरलेल्या मंत्री महोदयांचा फुकटचे श्रेय ओरपण्यासाठी केंद्र सरकारकडून मुंडे भगिनींनी आणलेल्या परळी बायपास व परळी धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गाच्या भुमिपुजनाचा केविलवाणा कार्यक्रम .
— Pankaja Munde's Office (@pmo_munde) July 3, 2021
दहा पैश्याचे योगदान नसताना दहा रुपयाचा निधी देखील आणण्यात अपयशी ठरलेल्या मंत्री महोदयांचा फुकटचे श्रेय ओरपण्यासाठी केंद्र सरकार कडून मुंडे भगिनींनी आणलेल्या परळी बायपास व परळी धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनाचा केविलवाणा कार्यक्रम. अशा शब्दात त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- १५ वर्षाच्या संसारानंतर आमिरने घेतला किरणशी काडीमोड
- वयाचा आणि कोरोनाचा मुद्दा पुढे करून ईडीच्या चौकशीला दांडी मारणारे देशमुख दिल्लीला गेलेच कसे ?
- भर मैदानात आली २ खेळाडूंना चक्कर; पाकिस्तान वेस्ट इंडिज सामन्यातील घटना
- प्रत्येक वेळी आयसीसी ट्रॉफी जिंकणे शक्य नाही : कपिल देव
- ज्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात डिनो मोरियाची संपत्ती ईडीने जप्त केली ते प्रकरण नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

