🕒 1 min read
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडू जखमी झाल्याच्या घटना अनेक वेळा घडत असताता. एखाद्या सामन्यात दुखापतीमुळे खेळाडू मैदानातुन बाहेर गेल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे. मात्र सामना सुरु असताना दोन खेळडूंना चक्कर आल्यामुळे मैदान सोडावे लागले.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पाकिस्तानचा महिला संघ गेला आहे. या दौऱ्यावरील दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या दोन महिला खेळाडु चक्कर येऊन मैदानात पडल्या. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाची फलंदाजी सुरु असताना पहिल्या दहा मिनीटात वेस्ट इंडिजच्या आलिया एलीन आणि चेडीयन नेशन या दोन खेळाडूंना चक्कर आली आणि त्या मैदानात पडल्या.
Scary scenes here during 2nd T20I
The on air commentators confirm that one more West Indian player has collapsed. #WIWvPAKW #WIvPAK pic.twitter.com/g9zjvAN72c
— Female Cricket (@imfemalecricket) July 2, 2021
या घटनेनंतर या दोन्ही महिला खेळाडूंना तातडीने स्ट्रेचरवरुन मैदानाच्या बाहेर नेण्यात आले. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना चक्कर का आली यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा डकवर्थ लुईसच्या नियमाच्या आधारावर ७ धावांनी पराभव केला.
West indian women cricketer Chinelle Henry's checkup is undergoing…. Hope she ll be fine…@Chinellehenry
VC: @windiescricket#WIWvPAKW #WIWvsPAKW pic.twitter.com/vKtH6ifmfI
— Qadir Khawaja (@iamqadirkhawaja) July 2, 2021
महत्वाच्या बातम्या
- ज्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात डिनो मोरियाची संपत्ती ईडीने जप्त केली ते प्रकरण नेमके आहे तरी काय ?
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

