Share

प्रत्येक वेळी आयसीसी ट्रॉफी जिंकणे शक्य नाही : कपिल देव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर टीम इंडियावर बरीच टीका होत आहे. संघाच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, 1983 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देवने टीम इंडियाचा बचाव केला आहे. कपिल देव म्हणाले की, लोक त्वरित टीका करण्यास सुरवात करतात, तर टीम इंडिया सतत बाद फेरीत स्थान मिळवत आहे.

२०१४ ते २०२१ या काळात टीम इंडिया निश्चितपणे प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली आहे. २०१५ वर्ल्ड कप, २०१६ टी -२० विश्वचषक आणि २०१९ वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत भारताने प्रवेश केला. त्याचवेळी टीम इंडिया २०१४ टी-२० विश्वचषक, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी स्पर्धेत उपविजेते ठरली होती.

कपिल देव यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, ‘आम्ही नेहमी सेमी फायनलमध्ये पोहोचतो की अंतिम? आम्ही खूप लवकर टीका करण्यास सुरवात करतो. प्रत्येक वेळी ट्रॉफी जिंकणे शक्य नाही. टीम इंडिया किती चांगला खेळला हे तुम्ही पाहता. फक्त अंतिम किंवा उपांत्य सामन्यात सामना गमावून आपण दबाव नियंत्रित करू शकत नाही असे म्हणणे योग्य आहे का ..?

पुढे कपिल देव म्हणाले, ‘असं होत नाही. तो त्यांचा दिवस होता आणि ते चांगले क्रिकेट खेळले. आम्ही ते अत्यंत गांभीर्याने घेत आहोत. जर एखाद्या सामन्यात कामगिरी खराब होत गेली तर त्यावर बऱ्याच वेळा टीका झाली. आम्ही आणि सद्य संघाने समान दबाव परिस्थितीत अनेक सामने जिंकले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!