🕒 1 min read
मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची धावाधाव सुरूच आहे. ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर देशमुख यांनी आता दिल्लीकडे धाव घेतली आहे. देशमुख हे दिल्लीतील वकिलांचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी रवाना झाले आहेत अशी चर्चा असून ते राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक झाल्यानंतर ईडीने आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोरोनाचा काळ आणि वय वाढल्यामुळे चौकशीला हजर राहण्यापासून मुदत मागितली होती. मग आता दिल्लीकडे जाताना देशमुख यांना वय आणि कोरोनाचा धोका वाटत नाही का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
ईडीने चौकशीला बोलावले त्यावेळी अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. अनिल देशमुखांनी वय, आजारपण आणि करोनाच्या धोक्याचे कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. माझे वय, तसंच कोविड-१९ चा धोका, सरकार कडून लावण्यात आलेले निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून मी ईडी कार्यलयात हजर राहू शकत नाही. जमल्यास माझा जबाब ऑडिओ, व्हिडिओमार्फत रेकॉर्ड करण्यात यावा असं विनंती पत्र अनिल देशमुख यांनी ईडीला वकिलामार्फत पाठवलं होतं.
वयाचा, आजारपणाचा आणि कोरोनाचा मुद्दा बरोबर असल्याचे मानले तरीही मग आता दिल्ली दौऱ्यावेळी याच गोष्टी अडचणीच्या का ठरल्या नाहीत हा मुख्य प्रश्न आहे. देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची आता त्यांना कल्पना आली असून ते आता स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटे बोलू लागले आहेत का असा देखील सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. काल परवा पर्यंत मी चौकशीला घाबरत नाही सर्व प्रकारचे सहकार्य करायला मी तयार असल्याचे छातीठोकपणे सांगणारे देशमुख आज पळवाट का शोधत आहेत याबद्दल देखील सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBIची ‘या’ बँकांवर मोठी कारवाई
- ईडीसह अन्य तपास यंत्रणांमुळे राज्यातील अनेक दिग्गज नेते लवकरच अडचणीत येणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

