Share

१५ वर्षाच्या संसारानंतर आमिरने घेतला किरणशी काडीमोड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमीर खान याची सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. सध्या या बातमीमुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

आमिर आणि किरणने स्टेटमेंटमध्ये म्हंटले की,’ १५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करणार आहोत,’ असे यात त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. त्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता. किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं.

अमीर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अमीर खानचा २०१८ मध्ये ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा आला होता परंतु या सिनेमाला जास्त प्रशंसा मिळाली नव्हती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!