Share

मंत्री थोरातांचा शेतकऱ्यांना दिलासा; स्वातंत्र्य दिनापासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबवणार

Published On: 

अहमदनगर : शेत जमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पण, २-३ गाव मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही. यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अप्लिकेशन निर्मिती करत पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली.

टाटा ट्रस्टच्या सहायाने या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली. मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकऱ्यांना पिकांची माहिती भरावी लागणार आहे. तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाईम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होऊन पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्याने पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल.

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे देखील सोईचे होईल. ई-पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन शक्य होणार आहे.

ई-पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर २० तालुक्यात राबवण्यात आला. मिळालेल्या प्रतिसादामुळे राज्यभर राबवण्याचा निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. राज्य सरकारने आदेश देखील जारी केला. ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या. पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख (पुणे) यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला. या अॅपमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे महसूलने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!