Share

अन वाद्य वाजवणाऱ्या दलित व्यक्तीला राज्यमंत्री सत्तार यांनी दिला उद्घाटनाचा मान!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमात उदघाटनासाठी आल्यावर याच कार्यक्रमात वाद्य वाजविणाऱ्या एका दलित व्यक्तीला बोलावून या उदघाटनाचा त्यांनी मान दिला. मंत्र्यांनी दिलेल्या मानसन्मानाने  वादक भारावून गेले. सत्तार यांचा या कृतीने दिवसभर याबाबत चर्चा रंगली होती.

शनिवारी ( दि. २५ ) विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडी शाखा नामफलकाचे अनावरण निमित्त राज्यमंत्री अब्दुल सत्तार भवन जि. प. सर्कलच्या दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त गव्हाली येथे नियोजित उदघाटन कार्यक्रमासाठी अब्दुल सत्तार पोहोचले. यावेळी कार्यक्रमात उदघाटनासाठी गावातील पुंडलिक कांबळे हे वाद्य वाजवीत होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाद्य वाजविणाऱ्या पुंडलिकला आवाज देत उदघाटनाचा मान दिला. मंत्र्यांनी दिलेला या मानामुळे वाद्य वादक पुंडलिक कांबळे भारावून गेले.

एऱ्हवी ‘वाजव आणि बंद कर’ इतपत कार्यक्रमात फारसे कोणाचे लक्ष नसलेल्या या वाद्य वादकाला मंत्र्यांनी स्वतःचा उदघाटनाचा मान दिल्याने वादकही भारावून गेला होता. याआधीही सत्तार यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, विद्यार्थी, महिला बचत गट तर कधी गावातील अपंग व्यक्तींना उद्घाटनाचा मान दिला आहे. सामान्य माणसांबरोबरच बालगोपाळात मिसळण्याचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा स्वभाव आहे. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!