Share

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ मागणीचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांची स्वतंत्र्य बैठक झाल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अमित शहा यांनी वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माओवादग्रस्त भागातील रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्राचे बांधकाम यासह अनेक विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने 1200 कोटींची केंद्राकडे मागणी केली आहे.

‘महाराष्ट्रात गडचिरोली माओवाद क्षेत्र कमी होत आहे. पण शहरी नक्षलवाद मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे, महाराष्ट्र सरकारने 1200 कोटींची केंद्राकडे केलेली मागणी ती योग्य आहे, असं म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागणीचं पहिल्यांदाच स्वागत केलं आहे.

नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याबाबत गृहमंत्र्यांना आकडेवारी सांगितली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!