🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक निवडणूक महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्रित लढवावी असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसने प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. ही दोन्ही कालवे अत्याधुनिक पद्धतीने दुरुस्त केले जाणार आहेत. ज्यामुळे परभणी सारख्या शेवटच्या टोकापर्यंतही शेतकऱ्यांना कालव्याचे समान पद्धतीने पाणी मिळेल. यासाठी काही हजार कोटींचा निधी अपेक्षित आहेत. जायकवाडी धरणातील गाळ काढला तर पाणीसाठा आणखी वाढणार आहे. याबाबतही याबाबतही विचार सुरू आहे.
जलसंपदा विभागातील रिक्त जागांच्या भरतीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. वरिष्ठ अभियंत्याच्या नियुक्त्या विभागामार्फत तर इतर कर्मचारी बाह्य एजन्सीद्वारे भरण्याचा विचार सुरू आहे. वाल्मी पुन्हा जलसंधारण विभागाकडून चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. नाशिक नगर वळण बंधाऱ्याचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी ६६६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संज्या ते पवार कुटुंब; वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील’
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
