Share

५१ टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा- चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

पुणे : आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्रांचा वर्षावलेला आहे. ‘आमची क्लिअर भूमिका आहे. आम्ही ठरवलंय, ५१ टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा’, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की,’चांदा ते बांदा दरम्यानच्या मतदान केंद्रावर २५ लाख युवांना संकल्प यात्रा काढून जोडण्याचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. २५ डिसें. हा अटलजींचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्ही हा संकल्प पूर्ण करू’. तसेच यावेळी ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीका करत ते म्हणाले की,’महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामूळे ओबीसी, मराठा आरक्षण गेले. आम्हाला या सरकारचा बदला घ्यायचा आहे. कोर्टाने ४ मार्चला सांगितले होते की राज्य सरकारने डेटा तयार करावा. परंतु सरकारने डेटा तयार केला नाही. हा डेटा सेन्सस डेटा आहे. त्यावेळी मनमोहन सिंगांनी सांगितले होते यात चुका आहेत. अजित पवारांनी खोटी माहिती दिली. या सरकारला आरक्षण द्यायचे नाही. त्यांना अन्यायच करायचा आहे’ असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’राज्यातील तीन पक्ष आपआपला अजेंडा घेऊन चालले आहेत. ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले १०० युनिट विजबिल माफ करू. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर सही केली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना १८ तास सरकार चालायचे आता मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही. मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना बंद पाडली. फडणवीसांनी सुरू केलेली ही योजना बंद आहे. मात्र नितीन गडकरींची केंद्रीय रस्ते योजना सुरू आहे. महाराष्ट्रातल्या योजना गेल्या कुठे?’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!