🕒 1 min read
मुंबई: राज्यात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडक संचारबंदी तसेच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. त्याच्या पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची ही लाट आणखी पसरू नये या साठी आवश्यक ते सर्व उपाययोजना राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.
राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पोलीस विभागाला केल्या आहेत. यावेळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सातारा पोलीस मुख्यालयातून व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत.
पोलिसांना आदेश देताना देसाई म्हणाले, विनाकारण कोणी रस्त्यावर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करावी, तसेच शासनाने लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. जे कुणी नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश राज्यातील पोलीस दलाला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काढले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा, महापौरांच्या मुलाला…’, सोमय्यांचा आरोप
- ‘महाजनांना बुधवार पेठेत दाखवा’; एकनाथ खडसेंची घणाघाती टीका
- भारतीय जवानांच्या धैर्यापुढे साक्षात हिमालय सुद्धा झुकला; व्हिडीओ व्हायरल
- पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; महापौर म्हणाले…
- ‘राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही’; रश्मी ठाकरेंवरच्या ‘त्या’ व्यक्तव्याला चंद्रकांत पाटलांचे समर्थन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
