Share

प्रत्येक वर्षी किमान दहा कोटी वृक्ष लगवडीचा राज्यमंत्री बनसोडेंचा संकल्प

Published On: 

🕒 1 min read

लातूर : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वनक्षेत्रात असमतोल आहे. पर्यावरण समतोलासाठी प्रत्येक जिल्ह्यात एकूण भूक्षेत्राच्या ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्याचे वन क्षेत्र ही खूप कमी असून वनक्षेत्रात समतोल राखण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक वर्षाला किमान दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष लागवड केलेले प्रत्येक झाड जगले पाहिजे; त्याचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी ही सविस्तर आराखडा तयार केला जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

नागराळ ता. देवणी येथे आयोजित एकाच दिवशी वीस हजार वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या पुढील काही वर्षात लातूर जिल्ह्यात प्रतिवर्षी किमान १ कोटी वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात येत असून जिल्ह्याचा वनक्षेत्राचा असमतोल दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे पर्यावरण राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगून वृक्ष लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी ही वन विभाग व प्रशासनाच्या मदतीने एक सविस्तर आराखडा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड संबंधित गुत्तेदार यांनी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच त्या महामार्गाच्या निविदा प्रक्रियेत ही अट घालण्यात आलेली असून संबंधित गुत्तेदार महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षलागवड करते का नाही त्यावर नजर ठेवली जाणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने जिल्ह्यात नवीन सॉ-मिल यांना परवानगी दिलेली नाही जिल्ह्यात अनधिकृत सॉ-मिल आहेत त्यांच्यावर १००% कारवाई केली जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!