Share

तिसऱ्या लाटेची शंका, त्यामुळे तयारीत कमतरता नको; राज्यमंत्री बनसोडेंच्या सूूचना

Published On: 

लातूर: कोरोना रुग्णांचे प्रमाण जिल्हयात कमी होत असले तरी तो कायमचा हद्दपार झालेला नाही. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने सदैव तत्पर आणि दक्ष राहणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. ते देवणी तालुक्यातील नागराळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित कोविड-१९ आढावा बैठकीच्या प्रसंगी बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व इतर अधिकारी उपस्थित होते. देवणी तालुक्यता कोरोना संक्रमण कमी होत आहे. तालुक्यात एकूण १२ बाधित रुग्ण्‍ असून ते रुग्ण्ही लवकर बरे होऊन घरी जातील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी या बैठकीत दिली. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कोरोना कमी झाला तरी संपला नाही. शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटे विषयी आशंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आपल्या तयारीत कुठलीही कमतरता ठेवू नका आरोग्य सर्वप्रथम आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे बनसोडे यावेळी म्हणाले.

कोरोना चाचण्यांचा प्रमाण कमी करु नका किमान २०० चाचण्या दररोज करावे. तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण समाधानकारक आहेत. तरी उर्वरित नागरिकांचे चालू ठेवावे.असे निर्देशही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले की नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करावे.कोरोनाची तिसरी लाट किती भीषण असणार हे आपल्या हातात आहे. आरोग्य यंत्रणाने गावपातळीवर बाधितांचा शोध घ्यावा आणि त्यांना उपचारासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!