लातूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत वैशाली सार्वजनिक बौद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ५३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हे बौद्ध विहार तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे या बौद्ध विहाराच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. लातूर शहरातील बौद्ध नगर भागातील वैशाली सार्वजनिक विहाराच्या सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे.
पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, बौद्ध विहाराचे या परिसरात अन्यसाधारण महत्त्व आहे हे ठिकाण म्हणजे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पवित्र ठिकाण असून या ठिकाणाच्या सुशोभिकरणाच्या कामाच्या आराखडा तयार करण्यात आला असून ही वास्तू अत्यंत सुंदर बनवली जाणार आहे. असे ते म्हणले.
त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर सोय झाली ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे व संभाव्य तिसरी लाट ही येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी योग्य ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे असून यामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभाग घ्यावा.
समाज कल्याण चे प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड यांनी प्रास्ताविक केलेया मध्येया बौद्ध विहार सुशोभीकरण कामासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ५२ लाख ६९ हजार निधी मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये ४७ लाख ४२ हजार म्हणजेच ९० टक्के निधी सामाजिक न्याय विभाग देणार असून उर्वरित दहा टक्के निधी म्हणजे ५ लाख २६ हजार रुपये वैशाली सार्वजनिक बुद्ध विहार संस्था देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्री अब्दुल सत्तारांचे ‘चहा प्रेम’, बाकावर बसून घेतला गावाकडच्या चहाचा आस्वाद!
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘सरकारकडून ‘ती’ यादी राज्यपालांना पाठवली पण अद्याप मंजुरी नाही’ ; राष्ट्रवादीचा घणाघात
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘क्रिडा विद्यापीठ औरंगाबादलाच मिळायला हवे’, यासाठी युवक काँग्रेस करणार जोरदार प्रयत्न!


