औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी आलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (दि.२) कार्यक्रमानंतर गावातील चहाच्या टपरीवरील बाकावर बसून चहा घेतला. यावेळी सत्तार यांनी टपरीचालक उत्तम चंद्रे यांना आपल्या बाजूने बसवत त्याची आपुलकीने विचारपूस केली. सत्तारांचा हा साधेपणा पाहून अनेकांना हा प्रसंग आपल्या कॅमेरात टिपण्याचा मोह आवरला नाही. दिवसभर संपूर्ण वर्तुळात अब्दुल सत्तार आणि त्यांचे ‘चहा प्रेम’ विषयी जोरदार चर्चा सुरु होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबाबत हा पहिलाच प्रसंग नसून दौऱ्यात असतांना ते सर्वसामान्य माणसाला मोठ्या आस्थेने विचारपूस करून त्याच्या अडीअडचणी जाणून घेतात. गेल्या आठवड्यात सोयगाव तालुक्यात आपला जुना मित्र भेटल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या डोक्यातील टोपी त्या मित्राला घातली. मराठवाडा अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात त्यांनी ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना आपल्या हाताने मास्क घालून याचे महत्व पटवून दिले.
अशा एक ना अनेक प्रसंगातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पहायला मिळाला. बोरगाव अर्ज येथे बाकावर बसून चहा घेत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, कृउबा समितीचे सभापती चंद्रकांत जाधव आदिंची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कास्टिंग काऊच करणाऱ्यांना तात्काळ अटक करा’; राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ धाडसी अभिनेत्रीचं कौतुक
- महाराष्ट्राला झिका विषाणूचा धोका ; केंद्र सरकारने पाठविले उच्चस्तरीय पथक
- ‘छत्रपती शिवरायांच्या नावाला जरी धक्का लावला तर…’ शिवसेनेचा अदानी समुहाला इशारा
- एरवी दिल्लीतील मुद्द्यावरून गोंधळ घालणारे पडळकर, मुख्यमंत्री गल्लीत येऊन गेले तरी शांत का?
- ‘आमचे सरकार टेक्नोलॉजीचे मिशन बनवण्याच्या विचारात’ – पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

