🕒 1 min read
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी आपली भूमिका मांडत आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.
‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वेळा आंदोलन केलं. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती.’, असं हसन मुश्रीफ यांनी आंदोलनस्थळी बोलताना म्हंटले आहे.
कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणाही साधला आहे. तसेच सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणं असेल हे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करणार, वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही देखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे ‘संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. पुन्हा एकदा भेटून चर्चा करणं गरजेचं आहे. संभाजीराजे यांना उद्याच्या उद्या वेळ द्यायला तयार आहोत. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया’. असे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे. तर, ‘हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही’, असं आश्वासन सतेज पाटील यांनी दिलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘अहंकार जोपासण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट व जनतेचे हाल हेच वसुली सरकार’
- संभाजीराजेंच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक, चर्चा करुन मार्ग काढूया – सतेज पाटील
- जय श्री रामच्या घोषणा दिल्या नाहीत म्हणून नव्हे तर ‘या’ कारणासाठी झाली ‘त्या’ वृद्धाला मारहाण
- डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात भारतच विजयाचा दावेदार- टीम पेन
- ‘रामायण’ मधील चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धपकाळाने निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
