🕒 1 min read
गाझियाबाद – आपली दाढी कापण्यात आली आणि ‘वंदे मातरम’ आणि ‘जय श्रीराम’ म्हणण्याची बळजबरी करण्यात आल्याचा दावा अब्दुल समद नावाच्या एका वयोवृद्ध व्यक्तीने व्हिडिओद्वारे केला होता. मात्र हे सर्व दावे खोटे असल्याचे समोर आले आहे.आपल्याला जंगलात नेऊन बांधून ठेवण्यात आल्याचा आरोपही अब्दुल समद यांनी केला होता.
व्हायरल व्हिडीओमधील वयस्कर व्यक्तीने अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र ही वयस्कर व्यक्ती त्या लोकांना ओळखत होती. तसेच तिथे जबरदस्तीने जय श्री रामच्या घोषणा देण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही असे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल समद हा तावीज बनावायचं काम करायचा. अब्दुल समदने बनवलेल्या एका तावीजचा कुटुंबावर उलट परिणाम झाल्याच्या रागातून त्यांना जाब विचारत मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळेच या घटनेला अशाप्रकारचा कोणताही धार्मिक संदर्भ नसल्याचं गाझियाबाद पोलिसांनी म्हटलंय.
अब्दुल समद ५ जून रोजी बुलंदशहरमधून बेहटा (लोणी बॉर्डर) येथे आले होते. इथून अब्दुल समद एका अन्य व्यक्तीसोबत मुख्य आरोपी असणाऱ्या परवेश गुज्जरच्या बंथला (लोणी) येथील घरी गेले होते. त्यानंतर परवेशच्या घरी काही वेळात इतर मुलं आली. यामध्ये कल्लू, पोली, आरिफ, आदिल आणि मुशाहिद या मुलांचा समावेश होते.
थाना लोनी बार्डर क्षेत्रान्तर्गत हुई घटना में #GhaziabadPolice द्वारा की गई कठोर कार्यवाही- 03 अभियुक्त गिरफ्तार ।
उक्त सम्बन्ध में पुलिस अधीक्षक, ग्रामीण की वीडियो बाईट।@Uppolice https://t.co/IIcMJIvn46 pic.twitter.com/ZGHGQIpXsh— POLICE COMMISSIONERATE GHAZIABAD (@ghaziabadpolice) June 15, 2021
परवेशसोबत मिळून त्यांनी अब्दुल समद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती.दरम्यान, या प्रकरणामध्ये परवेश गुज्जरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर १४ जून रोजी अन्य दोघांना यामध्ये कल्लू आणि आदिल यांना अटक करण्यात आलीय. इतर गुन्हेगारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, सामाजिक शांततेचा भंग केल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर तसंच काही पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
