🕒 1 min read
मुंबई : क्रिकेट जगतात सगळीकडे उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना २ दिवसानंतर सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
डब्ल्युटीसी सामन्याला अवघ्या २ दिवसाचा कालावधी उरला आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतच विजयी होईल असा दावा केला आहे. ब्रीस्बेन येथील एका पत्रकार परिषदेत त्याने हे वक्तव्य केले. भारतीय संघाने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले तर भारतीय संघ डब्ल्युटीसी अंतिम सामना सहज जिंकेल. टिम पेनने डब्ल्युटीसी स्पर्धेत न्युझीलंड संघाचा ३-० ने पराभव केला होता. तर यावर्षीच्या सुरुवातील भारताकडुन २-१ असा पराभव स्विकारला होता.
यावर्षच्या सुरुवातीला प्रमुख खेळाडु उपस्थीत नसतानाही भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत मात दिली होती. त्यामुळेच टीम पेनने डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात भारतच विजयी होईल असा दावा केला. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेलविण्यात येणार आहे. दोन्ही संघ सध्या साउथहॅम्पटनमध्ये दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या आवाहनावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
- मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे
- ‘नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन’, जिल्हाधिकारी जगताप यांची तंबी
- ‘डब्ल्युटीसी अंतिम एकादशमध्ये ‘या’ दोन्ही खेळाडुंचा समावेश व्हावा’, लक्ष्मणने व्यक्त केली इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
