Share

‘रामायण’ मधील चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धपकाळाने निधन

Published On: 

मुंबई : १९ व्या शतकात दूरदर्शनवरील ‘रामायण’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती. या मालिकेतील पात्र देखील अनेकांच्या पसंतीस पडली होती. या मालिकेतील ‘आर्य सुमंत’ हि भूमिका गाजली होती. मात्र ही भूमिका साकारणारे आणि लोकप्रियता मिळवणारे अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाल असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईतल्या अंधेरीमधील राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे नातू विशाल शेखर यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

https://www.instagram.com/p/Bxr81C3nVyL/?utm_source=ig_embed&ig_rid=bf3cffd1-4fa1-45a7-b373-bc0912578d9d

विशाल शेखर यांनी सांगितले की, ‘आजोबा झोपेत असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांना कोणत्याच प्रकारचा आजार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून अंगावर भरपूर ताप असल्याने त्यांना गुरूवारी जुहू स्थित क्रिटी केअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर ताप उतरला आणि आम्ही त्यांना एका दिवसांतच घरी आणले. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत रहायचं होतं, ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना घरी आणलं’. चंद्रशेखर वैद्य यांच्यावर उपचारासाठी घरातच एका रूग्णालयाप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती.

https://www.instagram.com/p/BnVEvM6n6ck/?utm_source=ig_embed&ig_rid=5d6cd1bf-7eef-4922-b751-b5999d9cda89

१९९८मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारली आणि ते घराघरात पोहोचले. ‘रामायण’ या मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेतील ते सर्वात वयोवृद्ध कलाकार होते. त्यावेळी त्यांचे वय ६५ वर्ष होते. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती.

चंद्रशेखर यांनी सुरवातीला त्यांनी एक ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरवात केली. त्यानंतर ५० ते ९० च्या दशकात गेटवे ऑफ इंडिया, बरसात की रात, कटी पतंग, द बर्निंग ट्रेन, नमक हलाल, डिस्को डान्सर, शराबी, त्रिदेव सारख्या चित्रपटात काम केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!