Share

‘तो’ प्रसंग पाहून मंत्री अमित देशमुखही झाले भावूक!

Published On: 

औरंगाबाद : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते औरंगाबाद येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला उभारणी समारंभ पार पडला. यावेळी आयुष्यभर आरोग्यसेवेची उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टर मंडळींना जीवन गौरव पुरस्काराने देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात अमित देशमुखांनी एका भावूक प्रसंगाचा अनुभव घेतला.

जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. इंद्रप्रकाश गजभिये यांचे दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी दु:खद निधन झालेले असल्याने त्यांच्या अर्धांगिनी डॉ. मिनाक्षी गजभिये या त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आल्या. मात्र, त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या डॉ. गजभिये यांच्या अस्थिंना सन्मानित करण्याची विनंती मंत्री महोदयांना केली.

डॉ. गजभिये यांना हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ते हयात होते. १० जूनला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार होते. परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलावा लागला. मंगळवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. इंदूप्रकाश गजभिये यांचा सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नी डॉ. मीनाक्षी यांनी स्वीकारावा अशी त्यांना विद्यापीठातर्फे विनंती करण्यात आली होती.

देशमुख यांनी आपल्या मनोगतात आवर्जून या भावनिक क्षणाची नोंद घेत डॉ. मिनाक्षी गजभिये यांची यापुढे काळजी घेणे ही शासनाची, वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी असून ती यथोचित पार पाडणे हिच डॉ. गजभिये यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले. यावेळी डॉ. अरूण महाले, डॉ. इंद्रजित गजभिये, डॉ. शरद कोकाटे, डॉ. ज्ञानेश्वर मुखेडकर, वैद्य रमेश गांगल, डॉ. अरूण भस्मे, डॉ. विलास वांगिकर या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!