बेळगाव : कर्नाटकातील बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोमात सुरू आहे. अखेरच्या टप्प्यात असलेल्या बेळगाव निवडणुकीत कोरोना नियमाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे बेळगाव मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी बेळगावला आले होते. दरबार गल्ली परिसरात दुपारी ते प्रचार करण्यासाठी आले होते. मात्र, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे कोरोना नियमावलींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सुमारे ३०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
एमआयएमचे बेळगाव येथील लतीफखान पठाण व वार्ड क्रमांक १ चे उमेदवार जोयाकतर डोनी वार्ड क्रमांक २ चे उमेदवार मुस्ताक ताशीलदार यांच्यासह इतर ३०० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. मार्केटचे पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, कर्नाटकमध्ये बेळगावसह हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा या तीन महानगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. येत्या ३ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपली सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तर बेळगावात भगवा फडकवण्यासाठी एकीकरण समितीने कंबर कसली आहे. मात्र, यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘मंदिरे उघडलीच पाहिजे अन्यथा..’, राज ठाकरेंचा इशारा

