Share

‘वीज नसल्याने लाखो रुपयांचा ऊस जळतोय’; सुळेंसमोर शेतकऱ्याने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

Published On: 

🕒 1 min read

इंदापूर : शेतकऱ्यांसमोर विजेचा लपंडाव ही मोठी समस्या कायम उभी राहते. पीक हाताशी येत असताना पावसाने दडी मारल्याने त्या पिकाला जगवण्यासाठी शेतकरी तांब्याने देखील पाणी घालतात. दरम्यान, पंपाने पिकांना पाणी देण्यासाठी विजेची वेळ ही रात्री-अपरात्रीची असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत असतं.

दरम्यान, इंदापूर तालुक्यात एका गावात काल खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील हजर होते. यावेळी शेतकऱ्यानं व्यासपीठावरच दोरीने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. भरणे यांनी व्यासपीठावर शेतकऱ्याची समजूत काढली. थकीत बील नसताना ही वीज कनेक्शन तोडल्या मुळे लाखो रुपयांचा ऊस जळू लागल्याने शेतकरी निराश होता. दरम्यान, भरणे यांनी या शेतकऱ्याची समजूत काढली.

याबाबत महावितरण कडून तात्काळ खुलासा करण्यात आला आहे. ‘शेतकरी शिवाजी कृष्णा चितळकर यांचे थकबाकीसाठी १८ ऑगस्ट रोजी तोडलेले वीज कनेक्शन त्यांनी थकबाकी भरताच २० ऑगस्ट रोजीच जोडून दिले होते. मात्र, खातरजमा करण्यापूर्वी त्यांनी झगडेवाडी येथील कार्यक्रमात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे,’ असं महावितरण कडून सांगण्यात आलंय.

२७४० रुपयांची थकबाकी असल्याने १८ तारखेला वीज तोडण्यात आली होती. मात्र थकबाकी भरल्यानंतर पुन्हा २० तारखेनंतर वीज जोडण्यात आल्याचे समोर आले असले तरी अनेक मंत्र्यांच्या, नेत्यांच्या बंगल्यांची वेगवेगळ्या स्वरूपाची असलेल्या थकबाकी विरोधात प्रशासन कधी कारवाई करणार ? शेतकरी आणि सामान्यांनाच का तगादा लावला जातो ? असे संतप्त सवाल केले जात आहेत. यासोबतच, शेतकऱ्यांच्या सोयीनुसार पिकांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!