Share

अजित पवारांवर मंत्री ठाकूर यांनी आरोप केल्यानंतर चंद्रकांत पाटलांच मोठं विधान !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. एका कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी महाविकास आघाडी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली.

अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यामधील पारसफाटा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात यशोमती ठाकूर बोलत होत्या. यावेळी ठाकूर म्हणाल्या की, बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. ४५० रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी एक हजार १२५ रुपये केलेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की कमीतकमी दोन हजार ५०० रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. असं म्हणतानाच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत,’ असा आरोप देखील ठाकूर यांनी केला आहे.

यानंतर महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरून असलेली धुसफूस पुन्हा एकदा समोर आली असून आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ‘यशोमती ठाकूर यांच्याप्रमाणेच अन्य मंत्र्यांचीही स्थिती हीच आहे. सगळ्याच मंत्र्यांची गळचेपी होत आहे,’ असं पाटील यांनी म्हटलं. यासोबतच, ‘महाविकास आघाडीमधील अनेक मंत्री नाराज आहेत,’ असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!