Share

‘संयमाची परीक्षा पाहू नका, संपून जाल’, तालिबानचा संदर्भ देत मेहबूबांची मोदींना धमकी

Published On: 

🕒 1 min read

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीप्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. अफगाणिस्तानात तालिबान नियंत्रणाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, तालिबानने अमेरिकेला पळून जाण्यास भाग पाडले. तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. हा संयमाचा बांध फुटला तर तुम्ही राहणार नाहीत, संपून जाल. शेजारी (अफगाणिस्तान) काय होतेय ते पाहा. त्यांनाही तेथून परत जावे लागले. तुमच्यासाठी अजूनही संधी आहे अशी धमकीच मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला दिली आहे.

त्या म्हणाल्या, ‘ज्या प्रकारे वाजपेयींनी चर्चा सुरू केली होती, काश्मिरात, बाहेरही (पाकिस्तान) व येथेही, तशीच चर्चा तुम्हीही सुरू करा. १९४७ मध्ये पंतप्रधान नेहरूंनी येथील लोकांच्या अस्तित्वाचे सर्व प्रकारे रक्षण केले जाईल, विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन काश्मिरातील नेतृत्वाला दिले होते. त्याचा विसर पडू नये.’

‘काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा शांतता निर्माण करायची असेल तर येथे नव्याने ३७० वे कलम येथे लागू केले जावे. चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्नांवर तोडगा काढण्यात यावा. तालिबान्यांमुळे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले, शेजाऱ्यांकडे पाहून केंद्र सरकारने वेळीच सावध व्हावे. सध्या जगाचे लक्ष तालिबानकडे लागले आहे. यानिमित्ताने मी देखील तालिबानी नेतृत्वाला जग तुमच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करू नका असे आवाहन करत आहे’ असे मेहबूबा म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!