🕒 1 min read
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने आता ‘युवा मोर्चा, युवा संवाद, डबा पार्टी’ या नव्या मोहिमेचे आयोजन केले आहे. भाजपच्या या डबा पार्टीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र यात सर्वाधिक चर्चा रंगली ती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी घरुन आणलेल्या भाकरी आणि ठेच्याची. आत्तापर्यंत कन्नड-सोयगाव तालुक्यातील बनोटी, पिंप्री राजा या भागांमध्ये डबा पार्ट्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
येणाऱ्या काळात औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे नुकतेच ग्रामीण भागात आणि शहरातही शिव संवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता कंबर कसली असून अनोख्या अशा डब्बा पार्टी मोहिमेचे आयोजन भाजपकडून करण्यात आलेले आहे. कन्नड व सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे युवा कार्यकर्त्यांसाठी खास अशा डबा पार्टीचे आयोजन रावसाहेब दानवे यांनी केले होते. यामध्ये गावपातळीवरील अडचणी समजून घेण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी अनेक सल्ले दिले. त्याचप्रमाणे पिंपरी राजा येथे ही संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जमिनीवर बसून जेवण करताना दानवेंनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. पिंपरी राजा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चांगुलपाय यांच्या शेतात भाजप युवा मोर्चा कार्यकर्ता मेळाव्यासह अनोखी अशी डब्बा पार्टी देखील रंगली. यावेळी प्रत्येकाने आपापल्या घरून जेवणाचा डबा आणला होता.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी देखील घरून बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा अशा प्रकारचा डबा आणला होता. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाकरी फडक्यात बांधून आणल्याने कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या डब्बा पार्टीची सर्वत्र चर्चा रंगली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जाती धर्मातील तरुणांनी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी कार्य करा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. या बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, अशोक पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
-
‘सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करणार’; भाजपच्या नेत्यांचा संकल्प
-
“…त्यामुळेच जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा”, शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल
-
‘अटकेच्या भीतीपोटीच हेडगेवारांनी…’; नितीन राऊतांचे वादग्रस्त वक्तव्यं
-
“मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
