औरंगाबाद : पूजा चव्हाण प्रकरणात अडचणीत आलेले मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनासाठी गोर सेनेच्या वतीने राठोड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. मागासवर्गीय नेत्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप या वेळी डॉ. कृष्णा राठोड यांनी केलाय.
या प्रकरणात संजय राठोड यांची बदनामी नव्हे तर सपूर्ण बहुजन समजाची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विराधातही या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. केवळ टीआरपीसाठी हे प्रकरण अवास्तव रंगवले जात असल्याचा आरोपही या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, ते मुख्यमंत्री असतांना झालेल्या अनेक प्रकरणात त्यांनी एसआयटी चौकशीला नकार दिला होता. असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी या वेळी केला. या वेळी गोर सेनेचे जिल्हाप्रमुख जयकिसन कांबळे, डॉ. कृष्णा राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- वयाच्या ८८ व्या वर्षी भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन करणार भाजपात प्रवेश
- ‘नाना पटोलेंचे ‘ते’ विधान केवळ प्रसिद्धीसाठी’ : फडणवीस
- ‘या’ तारखेला लाँच होणार स्कोडाची पहिली मेड इन इंडिया ‘संस्कृत’ नाव असलेली SUV कार
- अजानच्या आवाजाने अभिनेत्याची उडाली झोप; थेट मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

