Share

मिलिंद नार्वेकरांची मुंबई प्रीमिअर लीग T20 कोरोनामुळे लांबणीवर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट झालेला पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढतच चालला आहे. यामुळे शासनाने राज्यात संचारबंदीसह कोरोनाचे विविध नियम, निर्बंध जारी केले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रीमिअर लीग T20 क्रिकेट मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोव्हिड प्रादुर्भावामुळे एमपीएलचा तिसरा सिझन पुढे ढकलल्याची माहिती मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे. नार्वेकरांची चेअरमनपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी क्रिकेटच्या क्षेत्रातही आपली इनिंग सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे नार्वेकरांनी डिसेंबर 2020 मध्ये हाती घेतली होती. चेअरमनपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होती.

सध्या कोव्हिड प्रादुर्भावामुळे यंत्रणांवर असलेला ताण लक्षात घेत मालिकेचा तिसरा सिझन तूर्त न आयोजित करण्याचा निर्णय मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी संयुक्तपणे घेतला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरुन यांसंबंधी माहिती दिली. प्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेत पुढील आदेशापर्यंत मुंबई प्रीमिअर लीग T20 मालिका भरवणार नसल्याचं पत्रक जारी करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!