Share

‘नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिविर देणे धक्कादायक’

Published On: 

नंदूरबार – नंदूरबार जिल्ह्यातील गरीब आदिवासी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सीएसआर फंडातून सरकारला मोफत मिळालेली एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला विक्रीसाठी दिली, असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हीना गावित यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माध्यमप्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

डॉ. हीना गावित म्हणाल्या की, नंदूरबारच्या नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी ज्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत, त्यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रोटरी वेलनेस सेंटर या खासगी संस्थेसाठी एक हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली. रोटरी वेलनेस सेंटर ही संस्था शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संबंधित आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पत्र मिळाल्याच्या दिवशीच ६ एप्रिल रोजीच रोटरी वेलनेस सेंटर अँड मेडिसीन यांना शासकीय दरात एक हजार रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावेत असा लेखी आदेश नंदूरबारच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला. विशेष म्हणजे अशी इंजेक्शन मिळण्यासाठी रोटरी वेलनेसकडून नंदूरबारच्या जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाच लाख ९४ हजार ५०० रुपयांचा चेक ६ एप्रिल रोजीच मिळाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले.

डॉ. हीना गावित म्हणाल्या की, सीएसआर फंडातून नंदूरबारच्या गरीब रुग्णांना उपचारासाठी मोफत मिळालेल्या ४,००० रेमडेसिविर इंजेक्शनपैकी एक हजार इंजेक्शन जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका खासगी संस्थेला विक्रीसाठी देणे नियमबाह्य आहे. या इंजेक्शनची विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट असताना जिल्हाधिकाऱ्यांनी पाच लाख ९४ हजारांचा धनादेश स्वीकारून संस्थेला विक्रीसाठी दिली, हे सुद्धा चुकीचे आहे. शिवसेनेच्या नेत्याशी संबंधित खासगी संस्थेला लाभ पोहोचविण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्षांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी हे कृत्य केले आहे. नगराध्यक्षांचे विनंती पत्र आले, त्याच दिवशी संबंधित संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाकडे धनादेश जमा झाला व आणि त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला रेमडेसिविर देण्याचा आदेश दिला ही तत्परताही संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आपण करत आहोत.

त्यांनी सांगितले की, नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्णांची नोंद होत नाही. ज्यांची नोंद होते अशा रुग्णांनी रुग्णालये भरलेली आहेत. रेमडेसिविरचा तुटवडा आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिविर देणे धक्कादायक आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!