मुंबई : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने बाधित होत आहेत. औषधं आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इतकच काय तर स्मशानभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंग लिस्ट आहे. अशातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी चिदम्बरम यांनी केली.
पी. चिदम्बरम यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. देशातील जनतेला मूर्खात काढलं जात आहे. सरकारविरोधात जनतेने बंड पुकारले पाहिजे, असं चिदम्बरम म्हणाले. चिदम्बरम यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ऑक्सिजन, लस आणि रेमडेसिवीरचा कुठलाही तुटवडा नाही, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं. त्यांच्या हे वक्तव्य संताप आणणारे आहे. एवढचं नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यात लसीचा कुठलाही तुटवडा नसल्याचं म्हटल्याने आपल्याला राग येतोय, असं चिदम्बरम म्हणाले.
वृत्त वाहिन्यांवर दाखवले जाणारे फुटेज आणि वृत्तपत्रांमधील बातम्या खोट्या आहेत का? डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक खोटं बोलत आहेत का? सगळे व्हिडिओ बनावट आहेत का? देशातील सर्व नागरिकांना मूर्ख समजणाऱ्या या सरकारविरोधात जनतेने आता बंड पुकारले पाहिजे, असं चिदम्बरम म्हणाले.
मैं केंद्रीय स्वास्थ्य मंत्री के बयान से स्तब्ध हूं कि ऑक्सीजन या टीके या रेमडेसिवीर की कोई कमी नहीं है।
मैं यूपी के मुख्यमंत्री के बयान से भी स्तब्ध हूं, जिन्होंने कहा कि यूपी में टीकों की कोई कमी नहीं है।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 28, 2021
क्या सभी टेलीविजन चैनल फर्जी दृश्य प्रसारित कर रहे हैं? क्या सभी अखबारों की कहानियां गलत हैं? क्या सभी डॉक्टर झूठ बोल रहे हैं? क्या परिवार के सभी सदस्य गलत बयान दे रहे हैं? क्या सभी दृश्य और तस्वीरें फर्जी हैं?
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 28, 2021
लोगों को ऐसी सरकार के खिलाफ विद्रोह करना चाहिए जो भारत के सभी लोगों को मूर्ख समझ रही है।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिविर देणे धक्कादायक’
- उस्मानाबादेत कोरोना बाधित रुग्णांचा गावभर मुक्त संचार!
- सीएम रिलीफ फंडात बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार देणार एक महिन्याचे मानधन
- ‘केंद्र सरकारने जबाबदारी राज्य सरकारवरांवर ढकलून जनतेला वा-यावर सोडले’
- ‘न्यायालयांनी कोरोनासह अनेक मुद्यांवर ठाकरे सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते तेही सांगा कधी तरी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

