मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच कोरोनाच्या सावटाखाली भारतात यंदाची आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही खेळाडूनी स्पर्धा सुरु असताना मध्येच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यात भारताचा फिरकीपटू आर अश्विननेही स्पर्धा मध्येच सोडत कुटूंबाला प्राधान्य दिले. तर समालोचक आर पी सिंगनेही स्पर्धेतून माघार घेतली आहे.
कोरोना संसर्गाची सावली ही आयपीएल स्पर्धेवर गडद बनत चालली आहे. आता एका भारतीय आणि ऑस्ट्रेलियन पंचानी स्पर्धेतून माघार घेतली आहे. प्रसिद्ध भारतीय पंच नितीन मेनन हे त्यांच्या घरी परतले आहेत. नितीन मेनन यांची आई आणि पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफल यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या बघून ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या विमानावर बंदी घातली होती. त्यामुळे रायफल यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला अशी माहिती समोर येत आहे.
भारतात कोरोनाची परिस्थीती बघुन ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाय याने कोरोनापेक्षा आयपीएलला जास्त महत्त्व दिले जात असल्या कारणाने आयपीएलमधून नाव मागे घेतले. तर, आरसीबीसाठी खेळणाऱ्या ॲडम झम्पा व केन रिचर्डसन यांनीदेखील कोरोनाचे कारण सांगत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तर राजस्थान रॉयल्सचा खेळाडू लियाम लिव्हींगस्टोनने बायो बबलला कंटाळून आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिविर देणे धक्कादायक’
- उस्मानाबादेत कोरोना बाधित रुग्णांचा गावभर मुक्त संचार!
- सीएम रिलीफ फंडात बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार देणार एक महिन्याचे मानधन
- ‘केंद्र सरकारने जबाबदारी राज्य सरकारवरांवर ढकलून जनतेला वा-यावर सोडले’
- ‘न्यायालयांनी कोरोनासह अनेक मुद्यांवर ठाकरे सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते तेही सांगा कधी तरी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

