मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत नारायण राणेंना जोरदार टोला लगावला आहे. यानंतर नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात ट्विटर वार रंगला आहे.
मिलिंद नार्वेकर म्हणाले, “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?”
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?@MeNarayanRane
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 16, 2022
याला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, “सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा कॉल केला होता, हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.”
सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.@NarvekarMilind_
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 16, 2022
नारायण राणे काय म्हणाले?
नारायण राणे म्हणाले, “संजय राऊतांच लक्ष उद्धव ठाकरे जीथे बसले आहेत त्या खुर्चीवर आहे. हे शिवसेनेचे नाहीत, पुर्ण राष्ट्रवादीचे आहे. संजय राऊतांना सुपारी मिळाली आहे, यांना (उद्धव ठाकरे) हटव आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. कारण मुख्यमंत्र्याच नाव जाहीर होणार होत, त्याच्या आधल्या रात्री उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटायला गेले होते. त्यावेळी संजय राऊत आणि आदित्य त्यांच्याबरोबर होते.”
राणे म्हणाले, “तुम्हाला मी आज ओळखतो का? तुमची स्वार्थी प्रवृत्ती आहे. तुमची पुर्ण कुंडली माझ्याकडे आहे. देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत आहात. तुमच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध डिस्पोजल केससबद्दल, झालेल्या व्यवहाराबद्दल, तुमच्यापेक्षा मला माहित आहे. ते आदित्यने केलेले असो, वा अन्य कुणी ते सर्व व्यवहार माझ्याकडे आहेत.”
ईडीच्या अधिकाऱ्यांवर संजय राऊत यांनी काल आरोप केले. यावर नारायण राणे म्हणाले, “ईडीच्या अधिकाऱ्याने ३०० कोटी घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. ईडी अधिकाऱ्यांनी गप्प बसू नये, संजय राऊतांना उचलून न्यावे, थोडी पुजा करावी आणि पुरावे मागावे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करताय, तुमची काय लायकी आहे, तुम्ही कुठे आहात?”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

