मुंबई: आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्ष निवडीवर भाष्य केले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगतले आहे, तर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत महाविकास आघाडीची आज चर्चा झाली.
विधानसभा अध्यक्षांची निवड ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. यवेळी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर बोलताना नवाब मलिक म्हणाले, भाजपला दूध दिसत नाही, शेण दिसतं, अशा शब्दात टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘खासदारकी मिळवण्यासाठी ठाकरेंबद्दल चुकीची भाषा वापरली’; नारायण राणेंचा गौप्यस्फोट
“…तेव्हा बरेच लोक बेरोजगार होतील”; नारायण राणेंच्या आरोपांवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
‘लाव रे तो व्हिडीओ’; शिवसेनेचे नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर
IPL 2022 : जाणून घ्या का ट्रेंड होतोय “boycott chennai super king”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

