Share

कोहलीच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या पाकिस्तानच्या खेळाडुला मायकेल वॉनने दिले ‘असे’ उत्तर

Published On: 

मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन गेल्या काही काळापासून त्याने केलेल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहीला आहे. काही दिवसापुर्वी त्याने विराट कोहली आणि केन विल्यमसन यांची तुलना करत कोहलीवर टिका केली. तो म्हणाला की विराट कोहली केवळ लोकप्रियतेमुळेच श्रेष्ठ मानला जात आहे.

यानंतर मायकल वॉनवर अनेक स्तरातुन टिका झाली. यात एका नाव होते पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटु सलमान बट्ट याचे. सलमान बट्टने मायकल वॉनला उत्तर देताना म्हणाला होता की, ‘एकदिवसीय सामन्यात ज्याच्या नावावर एकही शतक नसलेल्या खेळाडूने ७० शतके केलेल्या फलंदाजाबद्दल बोलु नये.’ असा टोला लगावला. यावर मायकल वॉन त्याला प्रत्युत्तर देताना म्हणाला की, ‘तु अगदी बरोबर बोललास मात्र मी कधीही सामना निश्चीतीच्या प्रकरणात सहभागी नव्हतो काही खेळाडूप्रमाणे’ असे जोरदार प्रत्युत्तर दिले.

या उत्तराने मायकेल वॉनने सलमान बट्टला त्याने केलेल्या २०१० मधील मॅच फिक्सींग प्रकरणाची आठवण करुन दिली. २०१० साली सलमान बट्ट इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी दोषी आढळला होता. या प्रकरणात त्याच्यावर बंदी देखील घालण्यात आली होती. मायकेल वॉनने सोशलमीडीयावर ही पोस्ट करत आपला राग व्यक्त केला. मायकल वॉनच्या या उत्तरानंतर सलमान बट्टकडुन कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!