Share

चेन्नईचा प्रशिक्षक मायकल हसीची पुन्हा एकदा कोरोनावर मात, मायदेशी रवाना

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र यादरम्यान अनेक संघाच्या विविध खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यात सीएसकेचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीला दोन वेळेस कोरोनाची लागण झाली होती.

मात्र आता हाती आलेल्या वृत्तानुसार त्याने दुसऱ्यांदा कोरोनावर मात केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसीने यशस्वीरित्या कोरोनावर पुन्हा एकदा मात केली आहे. कोरोनाचा पराभव करत मायकल हसी मायदेशी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. आज सोमवारी म्हणजे १७ मे रोजी हसी ऑस्ट्रेलिया गाठण्याची शक्यता आहे. रविवारी १६ मे रोजी तो दोहा मार्गे ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला होता.

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसी चार्टर्ड विमानाने दोहा येथे पोहोचनार आहे. नंतर तेथून तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. आयपीएल २०२१ स्पर्धेत हसीसह संदीप वॉरियर, वरूण चक्रवर्ती, अमित मिश्रा, टीम सिफर्ट व वृद्धिमान साहा या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव स्पर्धेत पुन्हा वाढू नये यासाठी बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित केली

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!