Share

चक्रीवादळाचा तडाका; आतापर्यंत कोकणातील 6 हजार 500 पेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर

Published On: 

मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, सध्या अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांत तौत्के चक्रीवादळाचा परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. गोव्यानंतर आता चक्रीवादळाचा परिणाम तळकोकणात दिसत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. उद्या चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गोव्यात आपलं रौद्र रुप दाखवणाख्या तौत्के चक्रीवादळानं आता आपला मार्ग कोकणाकडे वळवलाय. आज मध्यरात्रीपर्यंत हे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळता येणार नसलं तरी जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनानं मोठी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापनाची पथकं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किनारपट्टीवर दाखल झाली आहेत. त्यांच्याकडून किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे.

रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 तर रायगड जिल्ह्यातील 2 हजार 500 नागरिकांचा समावेश आहे. तशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. तौत्के चक्रीवादळ आज रात्री उशिरा रायगड किनारपट्टीवर धडक देईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. त्यामुळे किनारपट्टी लगतच्या भागातील नागरिकांचं स्थलांतर सुरु आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्त्यातील 1600 लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई चर्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने गस्त घातली जात आहे. दादरच्या किनारपट्टीवर महापालिकेने लाईफ गार्ड तैनात केले असून सात जणांची टीम कुणालाही समुद्रात जाण्यापासून मज्जाव करत आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उद्या म्हणजे १७ मे रोजी होणारं कोरोना लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील लसीकरण बंद राहणार असल्याचं महापालिकेकडून जाहीर करण्यात आले. आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!