Share

इंग्लंड दौऱ्यापूर्वी ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढली ; ‘हे’ मुख्य खेळाडू अजूनही अनफिट

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

मात्र, मालिकेपूर्वीच ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. कारण इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेले वृद्धिमान साहा, लोकेश राहुल व प्रसिध कृष्णा हे खेळाडू अजूनही अनफिट आहेत. फिटनेस टेस्ट पास केल्यानंतरच या तिघांना इंग्लड दौऱ्यावर जात येणार आहे.

आयपीएलच्या 14 व्या सत्रादरम्यान वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. सध्या दिल्लीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 10 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, दुसऱ्या टेस्टमध्ये तो पुन्हा पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याचा क्वारंटाइन कालावधी वाढविण्यात आला आहे.

प्रसिध कृष्णला देखील आयपीएलच्या स्थगितनंतर कोरोनाची लागण झाली होती. सध्या तो होम क्वारंटाइन आहे. 19 मे पूर्वी दोन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आणि फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर त्याचा ‘टीम इंडिया’त सहभाग होऊ शकतो.

लोकेश राहुल आयपीएल स्पर्धेदरम्यान पंजाब पिंग्ज संघाचा कर्णधार असलेल्या लोकेश राहुलचे 3 मे रोजी अपेंडिसाइटिसचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी त्याला किमान 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या महत्त्वाच्या खेळाडूपुढे फिटनेसचा मोठा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!