मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.
जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवला जाईल. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
रवींद्र जाडेजा व हनुमा विहारी या दोघांचे टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले असून हार्दिक पांडय़ा व कुलदीप यादव या दोघांनाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही. अशातच टीम इंडियामध्ये पुनरागमन करणारा हनुमा विहारीनं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया उत्तम कामगिरी करणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
विहारी म्हणाला की, ‘मी डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंड सीरीजसाठी उत्तम खेळी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. सर्व भारतीय चाहत्यांसाठी हा सामना अत्यंत रोमांचक असणार आहे. आम्ही न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाविरोधात हा सामना खेळणार आहोत. त्यामुळे तेथील परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, टीम इंडिया अनेक अशक्य गोष्टी शक्य करु शकते.’
पुढे विहारी म्हणाला की ‘मला खात्री आहे की, आम्ही डब्ल्यूटीसी फायनलमध्ये उत्तम कामगिरी करुच. मी डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंड सीरीजसाठी कसून सराव करत आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- चेन्नईचा प्रशिक्षक मायकल हसीची पुन्हा एकदा कोरोनावर मात, मायदेशी रवाना
- चक्रीवादळाचा तडाका; आतापर्यंत कोकणातील 6 हजार 500 पेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर
- खतांच्या दरात वाढ : ‘आता शेतकऱ्यावर “दुष्काळात १३ वा महीना” म्हणण्याची वेळ आलीये’
- गोव्यातील भाजप सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे ; काँग्रेसची मागणी
- #तोक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूरलाही फटका; घरांसह शाळांचे छत उडाले, लाखोंच नुकसान

