औरंंगाबाद : अल्पवयीन मेव्हणीला शेतात नेत तिच्यावर बलात्कार करणा-या २० वर्षीय भावजीने दुस-यांदा सादर केलेला नियमीत जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी फेटाळला.
प्रकरणात १३ वर्षीय पिडितेने तक्रार दिली. तक्रारीनुसार, मुळची मध्यप्रदेशात राहणारी पिडिता ही घटनेच्या तिन महिन्यांपूर्वी वैजापुर तालुक्यात राहणा-या मोठ्या बहिणी व भावजीकडे कामासाठी आली होती. ते तिघे वैजापुर तालुक्यातील एका गावातील शेतात काम करत होते. २९ जुलै रोजी पिडितेच्या भावजीने काही ओळखीचे लोक आपल्या मुळ गावी जाणार आहेत, त्यांच्या सोबत तु घरी जा, असे सांगितले.
त्याला पिडितेच्या मोठ्या बहिणीने देखील होकार दिला. त्यानुसार सकाळी दहा वाजता पिडिता आपल्या भावजीसोबत दुचाकीवर बसली व त्याच्या ओळखीच्या लोकांकडे जाण्यासाठी निघाली. काही वेळाने पीडितेच्या भावजीने दुचाकी विटखेड्यातील एका शेताजवळ थांबविली त्यानंतर पिडितेला जबरदस्तीने जवळील शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- तर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू-जिल्हाधिकारी
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

