Share

‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

Published On: 

नवी दिल्ली : ई. श्रीधरन भारतीय जनता पक्षाकडून केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत.श्रीधरन यांना मेट्रोमॅन म्हणूनही ओळखले जाते. भाजपाकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

ई. श्रीधरन दोन आठवड्यांपूर्वीच भाजपमध्ये सामील झाले होते. त्यांची प्रतिमा एक स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी म्हणून राहिली आहे. 140 सदस्यीय केरळ विधानसभेच्या येत्या 6 एप्रिलपासून निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकीची मतमोजणी 2 मे 2021 रोजी होईल. केरळ भाजपचे प्रमुख के. सुंदरन् यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून भाजपकडून ई. श्रीधरन् यांच्या नावाची घोषणा केली आहे.

ई. श्रीधरन यांची मेहनत आणि बुद्धीमत्तेमुळेच दिल्ली मेट्रोसारखी स्वप्ने साकार झाली. ई. श्रीधरन यांना भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मश्री प्रदान केले आहेत.दिल्ली मेट्रोशिवाय कोलकाता मेट्रो, कोचीन मेट्रो आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांतही ई. श्रीधरन यांचे योगदान मोलाचे आहे.

विकासकामांमधील योगदानासाठी त्यांना फ्रान्स सरकारनेसुद्धा गौरवलं आहे. 2005 मध्ये त्यांना ‘Chavalier de la Legion d’honneur’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसंच अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने ई श्रीधरन यांना आशियाचा हिरो असंही म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!