Share

मेहबूब शेखला तात्काळ अटक करून केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी- चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आरोपीला तात्काळ अटक आणि शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी काल भाजपकडून तीव्र निदर्शनं केली गेली.

मेहबूब शेख यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याने भाजप आक्रमक झाली आहे. मेहबूब शेखला अटक का केली जात नाही? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात आहे. औरंगाबादमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. बलात्कारातील आरोपीला तात्काळ अटक करावी, आणि केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी, अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी काल त्यांच्यावरील बलात्काराचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. माझे मोबाइल रेकॉर्ड तपासा, अगदी नार्को टेस्टही करा. दोषी असलो तर फासावर जायला तयार आहे,’ असं शेख यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. मेहबूब शेख यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!