Share

कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही; शिवसेनेचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची काही खलबतं आणि कटकारस्थानं सुरू आहेत. यावर भाजप लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेऊन शिवसेनेने पळवाट काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असं सांगातनाच शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या आड राजकारण करू नये. दोन वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा शेलार यांनी दिला.

दरम्यान, भाजपच्या या आरोपांवर आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना कामाच्या बळावर निवडणुका लढवते आणि जिंकते. गटनेत्यापासून नेत्यापर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरून जनतेची कामे करतात. त्यामुळे कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही, असे चोख प्रत्युत्तर शिवसेनेने भाजपच्या आरोपांना दिले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या आरोपांचा आज खरपूस समाचार घेतला.

किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देताना आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. पालिकेच्या मागील निवडणुकीआधी भाजपने सत्तेचा गैरवापर करीत विभाग फोडून आपले ‘आकडे’ वाढवले. मात्र आता सत्तेत नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

पालिकेत आणि पर्यायाने मुंबईत आपण रसातळाला जाऊ अशी भीती भाजपला वाटत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. निवडणुका हा लोकशाहीचा भाग आहे. त्यामुळे कधीही निवडणुका झाल्या तरी शिवसेना सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचा विश्वासही महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!