Share

भाजपवासी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट ; काय झाली असेल चर्चा?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आज पुण्यामध्ये तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर एका जाहीर कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपवासी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट झाली. मुहूर्त होता तो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचा, यावेळी दोघांमध्ये व्यासपीठावर जवळपास १५ मिनिटं चर्चा झाली असे सांगण्यात येत आहे. काय चर्चा झाली हे अद्यप कळू शकले नाही.

दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहोचण्यास उशीर होत असल्याने व्यासपीठावर नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. शरद पवार इतर नेत्यांसोबत गप्पा मारत असतानाच विजयसिंह मोहिते पाटील तिथे पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी त्यांना समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितलं.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, नवनिर्वाचित आमदार रोहित पवार, भाजपा नेते विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील तसेच साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातही बराच वेळ चर्चा सुरु असल्याचं चित्र पहायला मिळालं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!