Share

‘‘तुझे केस पकडून तुला घराबाहेर काढेन”; सलमानने दिली बिचुकलेला धमकी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय तसेच वादग्रस्त रिअलिटी शो म्हणजे बिग बॉस. आता बिग बॉसचे १५ (Bigg Boss 15) वे पर्व सुरु असून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. आज वीकेंड का वार आहे, आणि सलमान खानची (Salman Khan) राग स्टाइल पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये सलमान स्पर्धकांना त्यांच्या चुका सांगताना दिसतो. तसेच करण कुंद्रा, उमर रियाज (Umar Riaz) आणि अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) यांना फटकारले आहे. इतकच काय तर घरातून बाहेर काढून टाकेन असे देखील म्हटले आहे.

दरम्यान बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात देण्यात आलेल्या टास्कमध्ये अभिजीत बिचुकलेने देवोलीना आणि प्रतीक सहजपाल यांना अपशब्द वापरले. त्यावर बोलताना सलमान म्हणाला, ‘तुझ्या घरातल्यांना कुणी शिवीगाळ केली तर तुला कसे वाटेल? मी तुला शेवटचे बजावतो. आठवड्याच्या मध्येच येऊन घरात घुसून तुझे केस पकडून तुला घराबाहेर काढेन. नाही तर घरात घुसून मारेन.’ त्यानंतर बिचुकले लिविंग एरियामधून उठून एक्झिट गेटकडे जाताना दिसतो. ‘खड्डयात गेला शो, मला अशा शोमध्ये थांबायचे नाही.

दरवाजा उघडा’ असे बिचुकले बोलताना दिसत आहे. दरम्यान, सलमान खान, करण कुंद्राला (Karan Kundra) देखील सुनावताना दिसतो. तेजस्वीला टास्कमध्ये पाठिंबा न दिल्यामुळे त्याने करणवर संताप व्यक्त केला आहे. आता अभिजित बिचुकले यांनी केलेली शिवीगाळ महागात पडणार असून या प्रकारे बिग बॉसच्या घरात क्लास घेणार असल्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे.

बिग बॉस घरातील बिचकुलेचे पहा फोटो.

महत्वाच्या बातम्या:

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!